Welcome to our brand new website!

पाठीच्या कण्याच्या विकारांवर निःशुल्क योगोपचार शिबीर

मराठी
English

पाठीच्या कण्याच्या विकारांवर निःशुल्क योगोपचार शिबीर

योगाभ्यासी मंडळ ही संस्था गेल्या ७२ वर्षांपासुन योग प्रचार प्रसार कार्य करित आहे. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वेगवेगळ्या आजारांवर योगोपचार करणे आणि व्याधी दूर करणे. आजच्या युगात पाठीच्या कण्याचे विकार फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. मानेमध्ये दुःख, कमरेमध्ये दुःख, हातामध्ये दुःख, हाताला मुंग्या येणे, हातात दुर्बलता येणे, कमरेमध्ये दुःख, पायाला मुंग्या येणे, पायाची ताकद कमी होणे अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात या सर्वांवर योगाचा फार चांगला उपयोग होतो आणि ही सर्व लक्षणे पूर्णतः बरी होतात. असा गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जाणिवेतून या विकारांवर उपचार करण्यासाठी एक मोठे शिबिर घेण्याची योजना योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूर येथे करण्यात आली आहे. हे शिबिर दिनांक 15 मार्च 2023 रोजी सकाळी 7 ते 8 या वेळात प्रारंभ होईल.

सर्व शिबिरार्थींनी सतरंजीवर आंथरायला एक पातळ चादर आणावी.
पुरुषांसाठी:- हाफ पॅन्ट, बर्मुडा, ट्रॅक सूट लोवर, टीशर्ट किंवा ढगाळ पैजामा बंडी असा वेश असावा.
महिलांसाठी:- पंजाबी ड्रेस किंवा ट्रॅक सूट हा वेश अपेक्षित राहील.

सर्वांनी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असल्याने लवकरात लवकर आपली नोंदणी करावी. हे शिबीर निःशुल्क असून प्रथम येणा-यास प्राधान्य राहिल. येताना आपले मेडिकल रिपोर्ट्स जरूर आणावे.

हे नि:शुल्क शिबिर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर नागपूर येथे दिनांक 15 मार्च 2023 ते 6 एप्रिल 2023 पर्यंत दररोज सकाळी 7 ते 8 या वेळात होईल याची नोंद घ्यावी.

मिलिंद वझलवार,
कार्यवाह,
जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर.

संपर्क:- जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर.

वेळ

  • सकाळी ७ ते ९:३०
  • सायंकाळी ६:०० ते ८:००

फ़ोन नंबर

  • +91 712 253 2329
  • +91 9850207022
  • +91 9545723332

Website by Creativity Please