Welcome to our brand new website!

Yogabhyasi Mandal’s Yog Courses & Exams get YCMOU recognition

On 14th December, the Memorandum of Understanding (MOU) for the same was signed between YMOU and the Janardan Swami Yogabhyasi Mandal. With the support and approval of Nashik’s Yashwantrao Chavan Maharashtra Open University (YCMOU), the Yogabhyasi Mandal’s Yog Courses & Exams, which include two diploma courses, i.e., ‘Yog Pravesh Diploma’ and ‘Yog Praveen Advanced Diploma’, courses will now be recognised by the University. This will help in raising Yog teachers who would selflessly impart quality Yog training to society as a mission of their life. 

Ever since the World Yog Day was conceived the demand of yog teachers has been rapidly increasing creating a challenging situation for our Yogabhyasi Mandal. This because, although there is a rapid increase in the number of professional teachers there is at the same time a massive shortage of dedicated & committed teachers offering their services free. In this context, it became imperative to develop more such authorized teachers in a mission mode, for which the university recognition of Mandal’s courses was very important. With the recognition of Mandal’s courses, this challenge would be addressed.

The work of Yogabhyasi Mandal is driven by its noble objective of building a cohesive, ethical & value based society that is possible only through the triad of dedicated, free yog education with the intention of making every human divine, leading to a happy, satisfied & healthy humanity. This MOU will be implemented to raise an army of free, dedicated yog teachers to further Mandal’s noble objectives without in any way compromising on its basic tenets and values.

To apply for the ‘Yog Pravesh’ course, qualifying the Yogabhyasi Mandal’s ‘Yog Parichaya’ course will be compulsory. Similarly, to apply for the advanced ‘Yog Praveen’ course, qualifying ‘Yog Pravesh’ will be compulsory. Together this would be a 3-year curriculum. All this has been possible because of the painstaking efforts of Dr Vayunandan (Vice Chancellor of YMOU), Dr Dinesh Bhonde (Registrar of YMOU), Dr Prakash Atkare, and Dr Narayan Mehre.

Yogabhyasi Mandal was established in Nagpur in 1951 by Parivrajkacharya Shri. Janardan Swami Maharaj with the pious objective of uplifting humanity by offering a happy, healthy and satisfied life to him. It was through this organization that he embarked on the noble mission of articulating the knowledge of Yog, instilled its philosophy and taught asanas to all irrespective of religion, caste, creed, sex, language or financial status totally free of cost. As the importance of Yog came home to people, Shri. Janardan Swami Maharaj also started in 1956 the ‘Yogabhyasi Mandal Certification Course’ to raise a fleet of trained Yog teachers. It is the biggest and most important annual project of the Mandal that has been selflessly going on without a single break since the last 62 years.

मानवाला जीवनात समाधान, सुख व निरोगत्व प्राप्त व्हावे ह्या उदात्त आणि महन्मंगल ध्येयाने प्रेरित झालेले योगमूर्ती परमपूज्य परिव्राजकाचार्य श्री जनार्दन स्वामी महाराज यांनी १९५१ मध्ये योगाभ्यासी मंडळाची ( सध्याचे जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाची ) स्थापना केली. ह्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना भाषा, लिंग, जात, धर्म, आर्थिक स्थिती यांचा कोणताही विचार न करता निःशुल्क आणि निरपेक्षपणे योग शिकवण्याचे महान कार्य त्यांनी प्रारंभ केले. लोकांना योगा विषयी आकर्षण वाटू लागल्यावर जनार्दन स्वामिंना योगशिक्षकांची अनिवार्यता जाणवू लागली. स्वामिंनी स्वीकारलेल्या ध्येयानुकुल शिक्षकांची फळी उभारण्यासाठी त्यांनी १९५६ पासून योगाभ्यासी मंडळाच्या प्रमाण पत्र अभ्यासक्रमास सुरुवात केली. योग शिक्षकांसाठी योगाची परीक्षा जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने गेली ६५ वर्षे अखंडपणे आणि अत्यंत उत्साहात अक्षुण्ण ठेवली आहे.

विश्वयोग दिनाच्या संकल्पने पासून संपूर्ण जगात योगाचे शिक्षण देणाऱ्या लोकांची मागणी वाढतच आहे. अशा प्रसंगी योगाभ्यासी मंडळाला परिस्थितीने एक मोठे आव्हान दिल्या सारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण पूर्णपणे समर्पण भावनेने निःशुल्क योग शिक्षण देणाऱ्या योग शिक्षकांची फारच मोठया प्रमाणावर कमतरता जाणवू लागली आहे. मात्र प्रोफेशनल पद्धतीने योग शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची संख्या भरपूर वाढत आहे. अशा प्रसंगी मिशन मोडवर योग शिक्षण देणाऱ्या अधिकृत शिक्षकांची संख्या वाढावी ह्या हेतुने मंडळाच्या आजपर्यंतच्या योग परीक्षांना शासकीय मान्यता प्राप्त व्हावी या प्रयत्नातून अवचित पणे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे सहकार्य आणि आपुलकी प्राप्त झाली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या कार्याची – त्या कार्यातील उदात्त हेतुची दखल घेऊन शुद्ध, सात्विक आणि सुसंघटित समाजाची बांधणी करण्यासाठी योग हाच एकमेव उपाय आहे व तोही समर्पण भावना, निःशुल्क शिकवण्याची इच्छा आणि नराचा नारायण करण्याची धारणा या त्रयी बरोबर मानवी जीवनात प्रत्येकाला  समाधान, सुख, निरोगत्व देण्याच्या हेतुने योग शिकविणाऱ्या शिक्षकांची सेना उभी करण्यासाठी मंडळाने स्वीकारलेली विचारसरणी आणि कार्य पद्धती या दोहोंचाही गौरव आणि आदर करीत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाने आज पर्यंत स्वीकारलेल्या मिशनरी भावाच्या ध्येय धोरणांना किंचितही धक्का लागू न देता मंडळाच्या योग अभ्यासक्रमाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांनी पदविका आणि प्रगत पदविका अशा दोन अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचे निश्चित केले आहे. एवढेच नव्हे तर त्यासंदर्भात आवश्यक असलेले मेमोर्रंडम ऑफ अंडरस्टडिंग ( MOU ) च्या करार पत्रावर स्वाक्षरी करण्याचा मुहूर्तही साधण्यात आला आहे.

“योग प्रवेश” या प्रथम पदविका अभ्यासक्रमसाठी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या योगपरिचय ह्या प्रमाण अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, तर प्रगत योग पदविका “योग प्रवीण” साठी “योग प्रवेश” परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एकूण अभ्यासक्र तीन वर्षांचा राहील. हा संपूर्ण अभ्यासक्रम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू श्री डॉ. वायुनंदन यांच्या समाजाभिमुख आणि उदात्त विचारसारणी मुळेच साकार होऊ शकला त्याच बरोबर विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ दिनेश भोंडे, डॉ प्रकाश अतकरे, डॉ सोनोने या सुस्वभावी त्रयींचाही सहभाग फार महत्वाचा ठरला, त्या बद्दल जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, डॉ वायुनंदन, डॉ  भोंडे, डॉ अतकरे व डॉ सोनोने या सर्वां विषयी अंतःकरण पूर्वक कृतज्ञता भाव प्रकट करीत आहे.

नागपूरच्या योगप्रेमी व समाजहितैशी, कर्तृत्व संपन्न जनतेला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळा तर्फे आवाहन करण्यात येत आहे की ह्या निरलस, निरपेक्ष, निःस्वार्थ व निःशुल्क भावनेने योग शिक्षण देण्यासाठी योग शिक्षक तयार करणाऱ्या या परीक्षांना प्रतिसाद द्यावा.

राम मो खांडवे

कार्यवाह

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर

MoU Signing Ceremony Photos

Website by Creativity Please