जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर येथे भगवान पतंजलीच्या मूर्तीची स्थापना. रेखीव, काळा पाषाणात साकार केलेली भगवान पतंजलीच्या मूर्तीची स्थापना उद्या गुरुवार दिनांक 11 मे 2023 रोजी सकाळी 7:15 वाजता करण्यात येणार आहे. या मूर्तीचे मूर्तिकार पद्मविभूषण श्री. सुदर्शन साहू या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष श्री. रामभाऊ खांडवे गुरुजी राहतील. धार्मिक विधीचे पौरोहित्य वेद शास्त्र संपन्न श्री. विवेक दाणी गुरुजी करणार आहेत. सर्व स्त्री पुरुष नागरिक, योग साधक, कार्यकर्ते आणि शिक्षक यांना आवाहन आहे की या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. मिलिंद वझलवार कार्यवाह जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर.