दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ ला जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगर, नागपूर, आयोजित रथसप्तमी उत्सव ट्रॅफिक पार्क, धरमपेठ, नागपूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाच्या वेळी प्रारंभी शंखनादाने तसेच सूर्याला अर्घ्य देऊन सूर्योपासनेला सुरुवात झाली.
हजारो योगसाधकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये १०० हून अधिक सर्व वयोगटातील योग साधकांनी कार्यक्रमात उत्स्फुर्त सहभाग घेतला व १४४ अखंड सूर्य नमस्काराच्या माध्यमातून यथोचित पद्धतीने भगवान सूर्यनारायणाला वंदन केले. याव्यतिरिक्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या अमरावती, यवतमाळ व उमरेड या शाखांमध्ये सुद्धा रथसप्तमी उत्सवाचे यशस्वी आयोजन केले गेले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व अतिथींचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह श्री. राम खांडवे यांनी रथसप्तमी ह्या दिनाचे महत्व विशद करून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. तिळगुळ प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Rathsaptami Utsav 2019: Photos (Nagpur)







Rathsaptami Utsav 2019: Photos (Amravati)


Rathsaptami Utsav 2019: Photos (Umred)


Rathsaptami Utsav 2019: Photos (Yeotmal)

