[article name=”Rathsptami Celebrated” keywords=”Rathsptami Celebrated” articlebody=”जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वर्धमान नगर शाखेच्या संयोगाने गेली ५ वर्षे रथसप्तमीचा सण सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानामध्ये दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला.२६ जानेवारी २०१५, रथसप्तमी आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सूर्योदयाच्या वेळी प्रारंभी शंखनादाने तसेच सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यपासनेला सुरुवात झाली” headline=”Rathsptami Celebrated – JS YOG, NAGPUR” datepublished=”2015-01-30″ sourceorganization=”Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur” publisher=”Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur”][/article]
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या वर्धमान नगर शाखेच्या संयोगाने गेली ५ वर्षे रथसप्तमीचा सण सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानामध्ये दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला.
२६ जानेवारी २०१५, रथसप्तमी आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सूर्योदयाच्या वेळी प्रारंभी शंखनादाने तसेच सूर्याला अर्घ्य देऊन सूर्यपासनेला सुरुवात झाली.
यामध्ये ३५० हून अधिक सर्व वयोगटातील योग साधकांनी प्रत्येकी १२ तसेच ३५ योग साधकांनी अखंड सूर्य नमस्काराच्या माध्यमातून यथोचित पद्धतीने भगवान सूर्यनारायणाला वंदन केले.
कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह श्री. राम खांडवे यांनी रथसप्तमी ह्या दिनाचे महत्व विशद केले आणि २१ जून २०१५ ह्या “जागतिक योग” दिनाबद्दल अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आव्हान केले. राष्ट्रगीताच्या गायनाने आणि तिळगुळ व दुधाच्या प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Copyright © 2023 Janardanswami Yogabhyasi Mandal, Nagpur
Website by Creativity Please