आपण सर्व स्वामीभक्तांनी गेली कित्येक वर्षे जोपासलेले एक स्वप्न, कि पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दनस्वामी महाराज यांच्या पादुकांचे अत्यंत सुरेख आणि भव्य मंदिर उभारावे, प्रत्यक्षात साकार होण्याचा मुहूर्त कळविण्यासाठी आणि याची देही याची डोळा साकार झालेले पादुकाभावनाचे व पाच माळ्यात योगाभ्यास उपयुक्त अशा भव्य दालनात विस्तारलेले शिल्प प्रत्यक्ष पाहण्यासाठी वास्तुशांतीचा सोहळा शनिवार दिनांक ९/०३/२०१९ रोजी सकाळी ९ वाजता निश्चित केला आहे. त्या अविस्मरणीय क्षणाला आपली उपस्थिती असावी अशी विनंती करण्यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण आपणास देत आहे.
खालील प्रमाणे दर्शविलेल्या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब, सहपरिवार व इष्ट मित्रांसह उपस्थित राहावे व आपल्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करावे हि विनंती.
कार्यक्रम
शुक्रवार दिनांक ८/०३/२०१९
- सकाळी ९ वाजता श्री स्वामींचा मूर्तीची व पादुकांची स्थापना
शनिवार दिनांक ९/०३/२०१९
- सकाळी ६ ते ७ सामूहिक योगाभ्यासाद्वारे योगमूर्तीच्या वास्तूचे वास्तुशांत.
- सकाळी ९ पासून वस्तूशांती विधी.
- दुपारी १२:३० वाजता वास्तुशांती महाप्रसाद
रविवार दिनांक १०/०३/२०१९
- सकाळी १० वाजता पादुकाभावनाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व केंद्र सडक परिवहन व राजमार्ग, जहाजरानी, जलसंसाधन, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्री श्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरच्या महापौर सौ नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.
- संध्याकाळी ७ वाजता स्वरवेध प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर प्रायोजित भक्ती गीतांचा कार्यक्रम प्रमुख कलाकार श्री अनिरुद्ध जोशी, श्री गुणवंत घटवाई व सौ मंजिरी वैद्य
आपला दर्शनाभिलाषी
राम मोरेश्वर खांडवे
कार्यवाह,
जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ,
रामनगर नागपूर